अल्पवयीन मुलीवर तीन महिने अत्याचार : आरोपीला 20 वर्ष शिक्षा


Abuse of minor girl for three months: Accused sentenced to 20 years भडगाव : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर तीन महिने अत्याचार करणार्‍या आरोपीला जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी बुधवारी 20 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. लखन उर्फ विजय रमेश गायकवाड (24, रा.भडगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

फूस लावून पळवत केला अत्याचार
आरोपी लखन गायकवाड याने 25 मे 2018 रोजी पीडितेला फूस लावून पळवून नेत तीन महिने अत्याचार केला होता तर या प्रकरणात अतुल उर्फ योगेश राजू गायकवाड याने मदत केली होती. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन भडगाव पोलिसात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिस उपनिरीक्षक आनंद पटारे यांनी या तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयात हा खटला चालला. विशेष सरकारी वकिल चारुलता बोरसे यांनी एकूण 11 साक्षीदार तपासले. यात पीडिता व तिच्या आईची साक्ष महत्वाची ठरली. ड. बोरसे यांचा प्रभावी युक्तीवाद व न्यायालयासमोर आलेले पुरावे लक्षात घेता न्यायालयाने लखन याला सहा कलमांमध्ये दोषी ठरवले तर अतुल याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !