जळगाव सराफ दुकान फोडले : आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव : सराफ बाजारातील ज्वेलरीचे दुकान फोडणारा अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासाच्या आत अटक केली. विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे (रा. पावर हाउस जवळील भिलवाडी जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सविस्तर असे की, जळगाव शहरातील होणा-या घरफोडी, दुकानफोडी चोरीच्या घटना वाढल्याने घरफोडी चोरी करणारे आरोपीताचा शोध घेणे बाबत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी यांच्या मागदर्शन व सुचना नुसार पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळवीली की, शनिपेठ पोस्टे सीसीटीएनएस गुरंन २०२ / २०२२ भा.द.वि कलम ४५७,३८० प्रमाणे सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपी विरूध्द दाखल होता. या गुन्हयात सराफ बाजार जळगाव येथिल मनिष ज्वेलर्स याचे दुकान फोडुन सोने चांदीचे दागिणे व रोख रक्कम चोरी झालेले असून ती चोरी जळगाव शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे (रा. पावर हाउस जवळ, भिलवाडी, जळगाव) येथे राहणारा याने त्याचे साथीदारांसह केली आहे अशी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली.


यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
उपनिरीक्षक अमोल देवढे पो. अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, विजय शामराव पाटील, नितीन बाविस्कर, अकरम शेख, अशरफ शेख, रवी नरवाडे, संतोष मायकल, महेश महाजन, सुरज पाटील, अविनाश देवरे, जयंत चौधरी, संदीप सावळे, उमेश गोसावी, राहुल बैसाणे सर्व नेमणुक स्था. गु. शा, अशांना आदेश दिल्याने सदर पथकाने प्रिंप्राळा हुडको येथून ताब्यात घेतले. त्यास व त्याचे रेकॉर्डवरील ०३ अल्पवयीन साथीदार रेकॉर्डवरील निषपण्णकरून आरोपी नामे विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे वय – २७ रा. पावर हाउस जवळील भिलवाडी जळगाव यांस गुन्हयाकामी ताब्यात घेतले आहे सदर गुन्हयामध्ये चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.