चिखलीतील तरुण शेतकर्‍याने मृत्यूला कवटाळले


यावल : तालुक्यातील चिखली बुद्रूक येथील खुशाल विठ्ठल पाटील (25) या अविवाहित शेतकर्‍याने सोमवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली. परतीच्या पावसामुळे शेतात नुकसान झाल्याने या शेतकर्‍याला आर्थिक फटका बसला तसेच मागील महिन्यात त्याची 50 हजार रूपये किमतीची म्हैस विषबाधेमुळे दगावली तेव्हापासून खुशाल आर्थिक विवंचनेत असतानाच त्याने मृत्यूला कवटाळले. पोलिस पाटील अरुण पाटील यांनी फैजपूर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शववचिच्छेदन केले. मृत शेतकर्‍याच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित व एक अविवाहित अशा दोन बहिणी आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !