जितेंद्र आव्हाडांना दिलासा : सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर


Relief to Jitendra Awhad : Bail Granted by the Sessions Court ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून आव्हाडांसह 12 जणांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तपासाला सहकार्य करण्याचे निर्दश ठाणे कोर्टाने दिले आहेत.

मोठा दिलासा
ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालामुळे जितेंद्र आव्हाडांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयीन कोठडी सुनावताच आव्हाडांनी तातडीने जामिनासाठी अर्ज केला. या जामीन अर्जावर आज दुपारी सुनावणी झाली. यावेळी त्यांच्यासह बारा जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अ‍ॅड. प्रशांत कदम यांनी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान अ‍ॅड. कदम यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाडांची अटक बेकायदेशीर आहे. अटक करण्याच्या 72 तास आधी आव्हाडांना नोटीस देणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांनी तसे केले नाही. नियमांचे उल्लंघ करुन, कोणताही प्रोटोकॉल न पाळता आव्हाडांना अटक करण्यात आली आहे.



पोलिसांच्या चौकशीला पूर्ण सहकार्य
आव्हाडांच्या वकिलांनी सांगितले की, आव्हाड हे पोलिसांना चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहेत. ते स्वत: पोलिस स्टेशनमध्ये नोटीस घेण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यावर जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर अजामीनपात्र गुन्ह्याची कलमे लावण्यात आली. आव्हाडांनी चित्रपटगृहात कोणालाही मारहाण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात दाखल गुन्हे चुकीचे आहेत. तर, सरकारी वकिलांनी चौकशीसाठी आव्हाडांची 8 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती मात्र न्यायालयाने ती फेटाळली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !