पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा


इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानमधील विशेष कोर्टाने ही शिक्षा सुनावली असून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप आहे.

लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला प्रथमच
एखाद्या सेवेतील अथवा निवृत्त लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची ही पहिलीच वेळ असून 2007 मध्ये परवेझ मुशर्रफ यांनी राष्ट्रपती असताना आणिबाणी लागू केली होती तर यावरून त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला सुरू होता. देशात आणीबाणी लादणे, सत्ता उलथविणे, संविधान नष्ट करणे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना अटक करणे आदी आरोप परवेझ मुशर्रफ यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. परवेझ मुशर्रफ यांनी 2007 ला शंभरहून अधिक न्यायाधीशांना पदावरून हटवले होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !