भुसावळ न्यायालय आवारात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
ल
भुसावळ : भूसंपादीत जमिनीा मोबदला मिळत नसल्याने बोदवड तालुक्यातील धोंडखेडा येथील दयाराम गोविंदा सुनसकर यांनी भुसावळ न्यायालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र सतर्क पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडत शेतकर्याला ताब्यात घेतले.
शेतकर्याने दिला होता इशारा
दयारास सुनसकर यांच्या धोंडखेडा, ता.बोदवड येथील गट नंबर 32/1985 या जागेचे भूसंपादन झाले असून या जागेचा मोबदला अद्यापही मिळत नाही, त्यामुळे सुनसकर यांनी न्यायालयाच्या आवारात गुरूवारी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. या शेतकर्याची 10 लाख 47 हजार 859 रूपयांची रक्कम शासनाकडून घ्यायची आहे. ही रक्कम न्यायालयातून धनादेशाद्वारे मिळणार असलीतरी ती लवकर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले होते.


पिशवीतून दोरी जप्त
सुनसकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने, गुरूवारी सकाळी नऊपासूनच न्यायालयाच्या परीसरात उपनिरीक्षक अंबादास पाथरवट यांच्या सह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. न्यायालयाच्या परीसरात सुनसकर येताच त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेत हातातील ल पिशवी ताब्यात घेतली. या पिशवीत आत्मदहनासाठी सुनसकर यांनी दोरी आणली होती, गळफास घेऊन ते आत्मदहन करणार होते.