दहा हजारांची लाच भोवली : जळगाव डीडीआर कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


Bribe of 10,000 : Assistant Co-operative Officer in Jalgaon DDR Office in ACB’s net  जळगाव : तक्रारदाराविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल होवू न देण्यासाठी तसेच प्रकरणाच्या प्रती देण्यासाठी व नाशिकच्या अपिलात मदत करण्यासाठी दहा हजारांची मागणी करून ती स्वीकारणार्‍या जळगाव सहकार निबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी शशिकांत नारायण साळवे (54, रा.मंगलमूर्ती नगर, पिंप्राळा, साईबाबा मंदीरा जवळ, जळगाव) यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांच्याच कार्यालयातच जळगाव एसीबीने अटक केली. या कारवाईने सहकार वर्तुळातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दहा हजारांची लाच भोवली
यावल तालुक्यातील दुसखेडा येथील 44 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांनी सन 2013 मध्ये दुसखेडा, ता.यावल येथील गट क्रमांक 165 मधील 97 आर.इतकी टायटल क्लिअर शेत जमीन विहीत खरेदी खत करून विकत घेतली. नंतर 2014 मध्ये सदर शेतजमिनीचे पूर्वाश्रमीचे मूळ मालक निलेश पाटील ही शेतजमीन परत मिळण्यासाठीचा भुसावळ येथील न्यायालयात दिवाणी दावा तक्रारदारासह इतर पूर्वीच्या खरेदीदारांविरोधात दाखल केला आहे व दावा न्यायप्रविष्ठ आहे. 2018 मध्ये पुन्हा निलेश पाटील यांनी जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था जळगाव या कार्यालयात देखील सदर शेत जमीन परत मिळण्यासाठीचा दावा तक्रारदारासह इतर व पूर्वीच्या खरेदीदार यांच्याविरुद्ध दाखल केला आहे. या दाव्याच्या प्रत्येक सुनावणी साठी तक्रारदार हे जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, जळगाव कार्यालयात उपस्थित होते. या दाव्याचा निकाल लागल्यानंतर आरोपी शशिकांत साळवे यांच्या कार्यालयात भेटल्यानंतर त्यांनी निकालाची प्रत प्राप्त ककेली मात्र निकालाच्या अंतिम आदेशात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम अन्वये आदेश असे नमूद असून त्याची प्रत पोलीस अधीक्षक, जळगाव यांना देण्यात आली व तक्रारदार यांना दाव्याच्या निकालाप्रमाणे त्यांचे स्वतः वर सावकारी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल होवू शकतो, अशी भीती घालून तसेच निकालाच्या सत्यप्रती लगेच देण्यासाठी पंचांसमक्ष शुक्रवारी आरोपीने लाच मागितल्यानंतर तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी दुपारी कार्यालयात आरोपीला अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक एस.के.बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

 


कॉपी करू नका.