महाविद्यालयीन तरुणीची तलावात आत्महत्या : धुळ्यातील प्रकार
College Girl’s Suicide in Pool : A Type in Dhule धुळे : महाविद्यालयात जाते म्हणून घराबाहेर पडलेल्या युवतीने नकाने तलावात आत्महत्या केली. चेतना पुरूषोत्तम पाटील (22, रा.प्लॉट नं.18 यशोधन कॉलनी, वलवाडी, देवपूर) असे मयत तरुणीचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
सोमवारी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास चेतना ही महाविद्यालयात जात असल्याचे सांगून दुचाकीने (एम.एच.18 बी.व्ही. 6922) ने बाहेर पडली मात्र सकाळी नऊ वाजता तरुणीचे आजोबा काशिनाथ काकुळदे यांना त्यांची दुचाकी नकाणे तलावाजवळ उभी असल्याचे व एका युवतीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे कळताच कुटुंबियांनी धाव घेतली.मयत ही तरुणी चेतना असल्याचे स्पष्ट झाले. तरुणीने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. याबाबत काशिनाथ खंडू काकुळदे (74) यांनी पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


