विद्यार्थी विकासासाठी आरोग्य चांगले असणे गरजेचे : रीता शर्मा


भुसावळ : विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे, त्यासाठी मोड आलेले तृणधान्येचे व कडधान्याचे सेवन केले पाहिजे तसेच शिक्षक राबवत असलेला उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मुख्याध्यापिका रीता शर्मा यांनी सांगितले.

पौष्टिक तृणधान्य उपक्रमाचे आयोजन
शहरातील श्री.र.नं.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विविध तृणधान्याचे स्टॉल लावण्यात आले. त्यांची माहिती देणारे तक्ते तयार करण्यात आले होते. तृणधान्याची माहिती देणारी पीपीटी शिरीष कोल्हे यांनी बनवले होते. संगणकाद्वारे विद्यार्थ्यांना तृणधान्याचे उपयोग सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी तृणधान्याचा अभिनय करून त्याबद्दल माहिती दिली. तृणधान्याची आकर्षक मांडणी करून विद्यार्थ्यांना त्यापासून होणारे विविध फायदे सांगितले. सूत्रसंचालन दीपक कुलकर्णी यांनी केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपक्रमासाठी मेहनत घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !