अहिरवाडीत गुरांच्या गोठ्यात आग : तीन जनावरांचा मृत्यू
रावेर : रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथे गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागल्याने तीन गुरांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
शेती साहित्यासह पाच लाखांचे नुकसान
रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील शेतकरी दगडू मगू लासुरे यांच्या गुरांच्या गोठ्याला बुधवारी रात्री 12 वाजेनंतर अचानक आग लागली. या आगीत दगडू लासूरे यांच्या दोन म्हैशीसह बैलाचा होरपळून मृत्यू झाला तसेच शेतातील लाकडी अवजारे, नळ्या, पाईप पुर्णपणे जळून खाक झाले. या आगीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच धनगर समाजाचे नेते संदीप सावळे यांनी घटनास्थळी भेट दिली.








