यावल शहरात नाकाबंदी : वाहतूक नियम मोडणार्यांवर कारवाई
Blockade in Yaval city : Action against traffic violators यावल : शहरातील भुसावळ टी पॉइंट जवळ फैजपूरचे डीवायएसपी, यावल पोलीस निरीक्षक सह पोलिसांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी नाकाबंदी केली व वाहतूक नियम मोडणार्या तब्बल 28 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. काही वाहन धारकांवर वाहतूक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
कारवाईने उडाली खळबळ
यावल शहरातील भुसावळ टी पॉइंट येथे शनिवारी रात्री फैजपूरचे डी. वाय. एस. पी. डॉ. कुणाल सोनवणे, यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे सह पथकाने नाकाबंदी केली. संपूर्ण राज्यात विविध कारणांनी अपघात घडत आहे. सदरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमाचे पालन प्रत्येक वाहनधारकांनी करावे म्हणून नाकाबंदी करून पोलिसांनी या ठिकाणी तपासणी केली या तपासणीत ड्रंक इन ड्राईव्ह, वाहतूक नियम मोडून वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी अशा एकूण 28 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली व रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरू होते. या नाकाबंदीमुळे चुकीच्या पद्धतीने व दारू पिऊन वाहन चालवणार्यांवर अंकुश येणार आहे. यामुळे अपघात रोखण्यास मदत होणार आहे असे पोलिसांनी सांगितले तर दररोज आता सकाळी, दुपारी व सायंकाळी नाकाबंदी केली जाईल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

