भुसावळात राष्ट्रीय दलित पँथरतर्फे भारतीय दलित अकादमी प्रदेशाध्यक्षांचा सन्मान


भुसावळ : राष्ट्रीय दलित पँथरतर्फे भारतीय दलित अकादमीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी सागर वानखेडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील रेल्वे नार्थ कॉलनीतील विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय दलित अकादमी जिल्हाध्यक्ष सागर वानखेडे यांची भारतीय दलित अकादमीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानिमित्त राष्ट्रीय दलित पँथर यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाचे आयोजक पँथरचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे व शहर उपाध्यक्ष भगवान निरभवणे होते. भारतीय दलित अकादमीचे प्रदेशाध्यक्ष सागर वानखेडे यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रकाश डोंगरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवी अशोक सरवटकर, ज्येष्ठ गायक रमेश वानखेडे, महेंद्र हिवराळे, भीमशक्ती जिल्हा कार्याध्यक्ष कवी अशोक भालेराव आदींची उपस्थित होती. सूत्रसंचालन सिद्धार्थ सोनवणे यांनी केले. एस.के.रशीद, पी.एच.मोरे, नितीन शिंदे, एच.हेमंत, लाहुजी भालेराव, नंदकुमार पदेन, आनंद तपासे, भगवान शिरसोदे, प्रकाश डोंगरे, नरहरी वासनिक यांच्यासह आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !