यावल शहरात गर्दीचा फायदा घेत एकाचवेळी नऊ मोबाईल लांबवले : नागपूरातील गँगचा बंदोबस्ताची मागणी
Taking advantage of the crowd in Yaval city, nine mobile phones were extended at the same time: Gangs in Nagpur demand settlement यावल : शहरात शुक्रवारी आठवडे बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत काही अज्ञात चोट्यांनी तब्बल नऊ जणांचे मोबाईल चोरी केले दरम्यान सायंकाळी मोबाईल चोरी करत असताना एका तरुणास जमावाने रंगेहात पकडत त्यास चांगलाच चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
मोबाईल चोरीने उडाली खळबळ
यावल शहरात दर शुक्रवारी आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत. शुक्रवारीदेखील तब्बल नऊ जणांचे मोबाईल चोरी झाले. मोबाईल चोरी करतांना एका तरुणास नागरीकांनी रंगेहात पकडले व त्यास जमावाने चांगलाच चोप दिला व त्यास इम्रान मोमीन, शोहेब मोमीन, शेख असलम, शेख अल्ताफ, शेख रियाज, शेख अकबर, हाजी फारूक यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रंगेहात मोबाईल चोरी करणार्या तरूणाचे नाव श्रीराम सरेन चव्हाण (नागपूर) असे आहे. एकूण चार जण बाजारात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत होते व त्यातील एका पकडले असता त्याचे तीन साथीदार फरार झाले आहे असे जमावाने सांगितले व रात्री यावल पोलिसात हाजी फारूक शेख यांच्या फिर्यादीवरून मोबाईल चोरीचा गुन्हा करण्याची कार्यवाही सुरू होती.
असे मोबाईल झाले चोरी
आठवडे बाजारातून हाजी फारुक शेख (डांगपुरा यावल), प्रमोद रमेश पाटील (सांगवी खुर्द), विनायक घनश्याम पाटील (विरावली), अजहर खान सिकंदर खान (रा. सईद पुरा यावल), शेख अन्सार शेख निसार (मन्यारवाडा, यावल), भटू चिंतामण दगडे (रा.आगारपाडा, धुळे), महेश विनायक पाटील (मनवेल) व सय्यद शफिक सय्यद निसार (डांगपुरा, यावल) यांचे मोबाईल चोरी झाले.