कुसुंब्यातील तरुण शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या


A young farmer from Kusumba committed suicide due to debt जळगाव : वाढत्या कर्जबाजारीपणापुढे हात टेकत कुसुंब्यातील तरुण शेतकर्‍याने घरी कुणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. दीपक संतोष पाटील (35, रा.कुसूंबा) असे मृत शेतकर्‍याचे नाव असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सोमवारी शोकाकुल वातावरणात मृत तरुण शेतकर्‍यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कर्ज वाढल्याने आत्महत्या केल्याचा संशय
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे दीपक पाटील हा तरुण शेतकरी शेती व्यवसायासोबत कंपनीत जावून आपला उदरनिर्वाह करीत होता. शेतीचे कर्ज वाढल्याने दीपक चिंतीत होता तर शनिवारी दीपक यांच्या सौभाग्यवती मुलांसह माहेरी गेल्यानंतर घरी दीपक व त्यांच्या आईच होत्या. रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास त्यांनी आईला दुकानात काही तरी वस्तू घेण्यास पाठविल्यानंतर पॅन्टच्या सहाय्याने घरात गळफास घेवून दीपकने आत्महत्या केली. रात्री आठ वाजेच्या सुमारास आई दुकानावरून घरी परतल्यावर त्यांना मुलाने आत्महत्या केल्याचे दिसताच त्यांनी टाहो फोडला. सोमवारी सकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास नाईक विकास सातदिवे करीत आहेत.


कॉपी करू नका.