अंगावर कचरा पडल्याचे सांगत 50 हजारांची रोकड असलेली बॅग लांबवली : वरणगावातील घटनेने खळबळ


A bag containing 50,000 cash was handed over saying that garbage had fallen on the body : The incident in Varangaon caused a stir भुसावळ : भुसावळ येथील मार्केटींग प्रतिनिधीची 50 हजारांची रोकड असलेली बॅग भामट्यांनी लांबवल्याची घटना वरणगाव शहरात सोमवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे दुचाकीवरून मार्केटींग प्रतिनिधी जात असताना त्यांना संशयीतांनी तुमच्या अंगावर घाण पडल्याचे सांगत थांबवत बॅगेची चोरी केली.

वरणगाव पोलिसात गुन्हा
गुलालगीस ईलायीस शेख (34, अयान कॉलनी, खडका) हे मार्केटींग प्रतिनिधी असून सोमवारी दुपारी ते वरणगाव शहरात कामानिमित्त आले असता सदगुरु मोबाईल शॉपीसमोर उभे असताना चोरट्यांनी त्यांची बॅग लांबवली. बॅगेत 49 हजारांची रोकड, एक हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 50 हजारांचा मुद्देमाल होता. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश जाधव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !