लग्नात मानपान मिळाला नाही, घरासाठी एक लाख आणले नाही म्हणून भुसावळातील विवाहितेचा छळ : पुण्यातील पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा
Harassment of a married woman in Bhusawla for not getting honor in marriage, not bringing one lakh for the house: Crime against five persons including husband in Pune भुसावळ : शहरातील माहेर व पुण्यातील सासर असलेल्या विवाहितेचा घरासाठी एक लाख रुपये न आणल्याने तसेच लग्नात मानपान न मिळाल्याच्या कारणावरून पुण्यातील पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा
प्रियंका श्रीकांत बनसोडे (31, जामनेर रोड, गायत्री नगर, भुसावळ) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी पती श्रीकांत सुकदेव बनसोडे (35), सासू छाया सुकदेव बनसोडे (55), सासरे सुखदेव श्रीराम बनसोडे (60), जावू प्राजक्ता गणेश बनसोडे (25), रुपाली शशीकांत बनसोडे (28, सर्व रा.न्यू लक्ष्मी नगर, भालचंद्र हॉस्पीटलजवळ, शिंदे हाऊस, तिसरा मजला,. पिंपळे गुरव, ता.हवेली, जि.पुणे) यांनी लग्नात मानपान दिला नाही तसेच माहेरून घरासाठी एक लाख रुपये न आणल्याने शारीरीक मानसिक छळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी. तपास नाईक तेजस पारीस्कर करीत आहेत.