सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवाला सुरवात


Chaitra Navratri Festival begins at Satpuda Niwasini Manudevi Temple यावल : तालुक्यातील आडगाव जवळील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्री क्षेत्र सातपुडा निवासनी आई मनुदेवी मंदिरात मोठ्या उत्साहात चैत्र नवरात्रोत्सवाला सुरवात झाली. येथे पारंपरीक पध्दतीने घटस्थापना करण्यात आली. संपूर्ण नऊ दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हजारो भाविकांनी पहिल्या दिवशी घेतले दर्शन
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी श्री क्षेत्रावर येवून दर्शन घेतले.
आडगाव, ता.यावल या गावापासून सातपुड्याच्या कुशीत खान्देश कुलस्वामिनी सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचे मंदिर आहे. सातपुड्याच्या निर्सगरम्य वातावरणात स्थित या मंदिरावर दरवर्षी चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या अनुषंगाने यावर्षी देखील बुधवारी श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरात घट स्थापना कार्यकम पार पडला. पूजेसह घटस्थापनेचा मान राहुल सोनवणे यांच्या हातून सहपत्नीक तसेच डांभुर्णी येथील पुरूजीत चौधरी व पल्लवी चौधरी या दाम्पत्यांच्या हस्ते महापूजा झाली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जळगाव मनपाचे माजी महापौर डॉ.अश्विन सोनवणे, राहुल सोनवणे, अमित सोनवणे, शैलेश सोनवणे, पुरूजीत चौधरींसह मंदिर संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी प्रभाकर पाटील, नितीन भास्कर पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील, सुनील महाजन, सोपान वाणी, एन.डी.चौधरी सह आदींची उपस्थिती होती. मंदिरात संपुर्ण धार्मिक विधी मंदिराचे व्यवस्थापक आर.के.पाटील, समाधान कोळी, गोपाल पाटील, जालम पाटील, महेंद्र पाटील यांच्या देखरेखीत पार पाडण्यात आली. दरम्यान,
नुकताचच पावसाळा संपला असून सातपुड्यात हिरवळ आहे व या निर्सगरम्य वातावरणात चैत्र नवरात्रोत्सवात श्री क्षेत्रावर दर्शना सह पर्यटनकरीता भाविक-भक्तांची पहिल्याचं दिवशी गर्दी झाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !