यावल शहरातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली


यावल : शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलच्या बाहेर लावलेली मोटरसायकल चोरट्यांनी लांबवली. यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
यावल शहरातील हरी ओम नगर भागातील रहिवाशी पवन धनराज पवार हा तरुण आपल्या मामे भाऊ भूषण दादू धोत्रे यांच्या मालकीची मोटरसायकल (क्रमांक एम. एच.19 डी. एस. 7850) घेऊन फैजपूर रस्त्यावरील हॉटेल अंजली समोर आला असता त्यांनी हॉटेलच्या समोर मोटारसायकल लावली तर काही वेळाने ते घरी परत जाण्याकरीता निघाल्यानंतर त्यांना दुचाकीची चोरी झाल्याचे लक्षात आले. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !