दसनूरला वीज चोरट्यांचा कारवाईनंतर दंड भरण्यास ‘ना’ : सात संशयीतांविरोधात गुन्हा


‘No’ to Dasnoor to pay fine after power theft case : Crime against seven suspects यावल : रावेर तालुक्यातील दसनूर येथे वीज चोरी केल्याप्रकरणी दंड सुनावल्यानंतरही दंड अदा करण्यात न आल्याने सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सात संशयीतांविरोधात गुन्हा
दसनूर, ता.रावेर येथे वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता मंगेशकुमार यादवसह योगेश कुरकुरे, पंकज तायडे, शेख साबीरुद्दीन, मुस्ताक शहा यांच्या पथकाने दसनूर या गावात वीज चोरांविरुद्ध तपासणी केल्यानंतर रघुनाथ महादू तायडे, निर्मलाबाई शालिक तायडे, जितेंद्र जीवन तायडे, पिंकी मुकेश हिवराळे, चिंदाबाई गव्हाणे, कोकिळा छगन सायमिरे, युवराज शामराव तायडे या सात जणांवर कारवाई करीत त्यांना 20 हजार 369 रुपये दंड सुनावण्यात आला मात्र उभयंतांनी दंड न भश्रल्याने त्यांच्याविरोधात कनिष्ठ अभियंता मंगेशकुमार यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !