यावल तालुक्यात वीज चोरट्यांना महावितरणकडून कारवाईचा शॉक
13 जणांविरोधात गुन्हा : वीज चोरटे वीज कंपनीच्या रडारवर
Shock of action by Mahavidran against electricity thieves in Yaval taluka यावल : यावल तालुक्यातील डोंगरकठोर्यासह रावेर तालुक्यातील उतखेडा, भातखेडा, दसनूर भागात वीज चोरट्यांविरोधात महावितरण कंपनीने विशेष मोहिम राबवून कारवाईने केल्यानंतर संबंधितांना वीज चोरी पोटी दंडात्मक नोटीसा बजावण्यात आल्या मात्र मुदतीनंतरही संबंधितांनी दंड न भरल्याने 11 वीज ग्राहकांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने वीज चोरट्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारवाईचा धडाका असाच सुरू राहणार असल्याची माहिती वीज कंपनीच्या सूत्रांनी दिली.
डोंगरकठोर्यात वीज चोरी : दोघांविरोधात गुन्हा
यावल : डोंगरकठोरा येेथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता हेमंत चौधरी यांनी आपल्या पथकासह गावात वीज चोरांविरुद्ध मोहिम राबवली. संजय अशोक आढाळे व रमेश मोहन आढाळे हे वीज चोरी करताना मिळून आढळल्याने दोघांना आठ हजार 736 रुपये दंडाची नोटीस बजावली मात्र या दोघांनी दंड भरलाच नाही. या दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.

दसनूरला वीज चोरी : सात जणांविरोधात गुन्हा
यावल : रावेर तालुक्यातील दसनूर येथे वीज चोरी केल्याप्रकरणी दंड सुनावल्यानंतरही दंड अदा करण्यात न आल्याने सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दसनूर, ता.रावेर येथे वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता मंगेशकुमार यादवसह योगेश कुरकुरे, पंकज तायडे, शेख साबीरुद्दीन, मुस्ताक शहा यांच्या पथकाने दसनूर या गावात वीज चोरांविरुद्ध तपासणी केल्यानंतर रघुनाथ महादू तायडे, निर्मलाबाई शालिक तायडे, जितेंद्र जीवन तायडे, पिंकी मुकेश हिवराळे, चिंदाबाई गव्हाणे, कोकिळा छगन सायमिरे, युवराज शामराव तायडे या सात जणांवर कारवाई करीत त्यांना 20 हजार 369 रुपये दंड सुनावण्यात आला मात्र उभयंतांनी दंड न भश्रल्याने त्यांच्याविरोधात कनिष्ठ अभियंता मंगेशकुमार यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
विवरासह उतखेडा, भातखेड्यात चौघांविरूध्द गुन्हा
यावल : विवरासह उतखेडा, भातखेडा या गावात चौघा वीज चोरट्यांना नोटीस बजावूनही त्यांनी दंड अदान केल्याने त्यांच्याविरोधात यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. विवरा, ता.रावेर येथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता ए.बी. दमाडे विश्वास कुवर, निलेश फालक, पंकज पिंगळे, मोरेश्वर पाटील यांच्यासह पथकाने विवरे, ता.रावेर येथे वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. त्यात विश्वनाथ नथ्थू चौधरी व शेख शरीफ शेख जहांगीर हे दोघै चोरी करताना आढळले तर उतखेडा गावात देखील वीज चोरी करताना ज्ञानेश्वर त्र्यंबक चौधरी तसेच भातखेडा येथे मोहिमेत सुरेश पुंजाजी ठाकरे हे वीज चोरी करतांना आढळल्याने
चौघांना दंडात्मक नोटीस बजावण्यात आली मात्र या चौघांनी दंड न भरल्याने चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.