पाळधीतील दंगलीनंतर पालकमंत्री स्पष्टच म्हणाले ; माझ्या जीवनातील सर्वाधिक वाईट प्रसंग, गैरसमजातून प्रकार


After the riots in Paladhi, the Guardian Minister clearly said ; Worst case of my life, kind of misunderstanding जळगाव : पाळधीत दोन गटात उसळलेल्या दंगलीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना हा 32 वर्षात गावात एकही भानगड होऊ दिली नाही शिवाय हा माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट प्रसंग असल्याचे सांगत गैरसमजातून दंगल झाल्याचा दावा केला आहे.

गैरसमजातून दंगल
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पाळधी या गावात दर पाच वर्षाला दंगल होत होती हा पोलिस रेकॉर्ड आहे पण मी 1992 नंतर या गावात एकही भानगड होऊ दिली नाही. बाहेरून पालखी आली आणि आमच्या गावात दंगल झाली. प्रार्थनेच्यावेळी डीजे बंद करण्यावरून वाद झाला आणि त्यानंतर ही दंगल घडली. गैरसमजातूनच हा प्रकार घडला आहे. दोन्ही बाजूकडील लोक हे आपलेच आहेत त्यामुळे यात जे दोषी असतील ते सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. आत्तापर्यंत 70 जणांना अटक झाली असून दोषींवर निश्चित कारवाई होईल, असेही ते म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !