भुसावळात खोट्या खरेदी खताद्वारे फसवणूक : दोघांविरोधात गुन्हा


भुसावळ : खोटे अभिलेख तयार करून जमीन हडप करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला असून या प्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शहरात अशा पद्धत्तीने लोकांना ठगवणारी टोळी कार्यरत असून प्लॉट खरेदीत कुणाची फसवणूक झाली असल्याचे पोलिस उपअधीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

असे आहे नेमके प्रकरण
भुसावळातील तक्रारदार सुधाकर गणपत खर्चे यांच्याकडून बाबूराव विठ्ठल चव्हाण यांनी 1982 मध्ये 35 हजार रुपये देवून शेतजमीन खरेदी केली होती. यातील .30 आर जमीन त्यांचा मुलगा अशोक बाबूराव चव्हाण यांच्या नावे करण्यात आली तर उत्तरेकडील हिश्यात अर्जदार खर्चे यांच्या पत्नी मालती सुधाकर खर्चे, शांताराम सदाशीव वाढे (फैजपूर), दत्तात्रय बाबूराव जोशी (फैजपूर) यांच्या नावाने जमीन खरेदी करण्यात आली आहे मात्र दोघांच्या नावे जमीन खरेदी करण्याचे ठरले असताना अन्य दोघांची लबाडीने नावे टाकण्यात आली. खरेदी केलेल्या जमिनीतील .40 आर जमिनी पालिकेकडे आरक्षीत झाल्यानंतर अर्जदाराला अंधारात ठेवण्यात आले व .20 आर जमीन शिल्लक असतानाही अर्जदाराला त्याची माहिती देण्यात आली नाही.

बनावट संमती पत्राद्वारे केली फसवणूक
सुधाकर खर्चे यांच्या तक्रारीनुसार, संशयित बाबूराव विठ्ठल चव्हाण यांनी सर्वे क्रमांक 10/08 क्षेत्र 0.60 आर.मिळकत खरेदी केल्यानंतर संशयीताने 3 डिसेंबर 1991 रोजी स्वतःच्या हस्ताक्षरात खोटे व बनावट संमतीपत्र लिहून त्यावर त्यावर तक्रारदार सुधाकर खर्चे यांच्या पत्नी तसेच काका तुकाराम खर्चे यांच्याकडून खोटे व बनावट संमतीपत्र तयार करून त्या संमती पत्रकाद्वारे सर्वे क्रमांक 10/08 क्षेत्र .60 आर मिळकतीचे हिस्से वाटे केले तसेच संशयित मयूर चव्हाण याने पत्नीऐवजी दुसरी बनावट महिला उभी केली व तिचा खोटा व बनावट जवाब सादर केला व बिनशेती आदेशात खाडा-खोड करून सरकारी नजराणा न भरता शासनाची फसवणूक केली. तब्बल दोन वर्ष चाललेल्या चौकशीनंतर या प्रकरणी सुधाकर गणपत खर्चे (67, शांती नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीवरून संशयित बाबूराव विठ्ठल चव्हाण व मयूर अशोक चव्हाण (दोन्ही रा.शांतीनगर, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मोहम्मद अली सैय्यद करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !