एमपीतील प्रौढाचा भुसावळात रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू


An adult in MP dies after being hit by a train in Bhusawal भुसावळ  : मध्यप्रदेशातील जबलपूरच्या प्रौढाचा शहरात रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू ओढवला. ही घटना सोमवारी घडली. राजनकुमार मिश्रा (43, जेडीए कॉलनी, संजीवनी नगर, जबलपूर) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बाजारपेठ पोलिसात नोंद
शहरातील रेल्वे लाईन खांबा क्रमांक डाऊन तीनच्या रेल्वे लाईनवर राजनकुमार मिश्रा यांना कुठल्यातरी रेल्वे गाडीचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला. या प्रकरणी पंकज अशोक मुळे यांनी बाजारपेठ पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक उमाकांत पन्नालाल पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !