घराबाहेर लावलेली दुचाकी लांबवली : नांदगावातील घटना
The thieves stole the bike from Nandgaon बोदवड : तालुक्यातील नांदगाव येथून घराबाहेर लावलेली 45 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
तक्रारदार रोहित अशोक पोळ (32, नांदगाव, ता.बोदवड) यांच्या तक्रारीनुसार, 6 रोजी मध्यरात्री ते 7 रोजीच्या पहाटेदरम्यान चोरट्यांनी 45 हजार रुपये किंमतीची पल्सर (एम.एच.19 सी.एच.3413) ही लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोळ यांनी बोदवड पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक सचिन चौधरी करीत आहेत.
