भुसावळात प्रतिबंधीत सिगारेटसह तंबाखू जप्त : दुकानदाराविरोधात गुन्हा
Seizure of prohibited cigarettes and tobacco in Bhusawal : Crime against the shopkeeper भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनी, छोटा हनुमान मंदिराजवळ प्रतिबंधीत सिगारेटसह तंबाखू विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाला मिळाल्यानंतर पथकाने कारवाई करीत एक हजार 10 रुपयांचा साठा जप्त केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजता करण्यात आली. या प्रकरणी नाईक यासीन सत्तार पिंजारी यांच्या फिर्यादीवरून संशयित जयराम गोवर्धनदास थारवाणी (सिंधी कॉलनी, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
किरणा दुकानदाराविरोधात गुन्हा
थारवाणी याचे सिंधी कॉलनीत किराणा दुकान असून त्यात प्रतिबंधीत सिगारेटसह तंबाखू विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कारवाईच्या सूचना केल्या होत्या. पथकाने थारवाणी यांच्या दुकानातून 350 रुपयांची तंबाखू, 112 रुपये किंमतीचे उंट बीडी बंडल, 200 रुपये किंमतीचे क्लासीक व फोर स्वेअर सिगारेट जप्त केली. तपास नाईक तुषार पाटील करीत आहेत.
