भुसावळ शहरात महामानवाच्या जयंतीचा उत्साह : उद्या शहरातून निघणार 29 मिरवणुका


In Bhusawal city, the excitement of Mahaman’s birth anniversary : 29 processions will leave the city tomorrow भुसावळ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती शहरात अत्यंत उत्साहात व शिस्तबद्धपणे साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील जयंती उत्सव समितीसह स्थानिक पदाधिकार्‍यांनी नियोजन केले आहे. शुक्रवार, 14 एप्रिल रोजी शहर व बाजारपेठ हद्दीतून 29 मिरवणुका निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शहरातील प्रत्येक चौकात निळ्या रंगाची रोशनाई करण्यात आली आहे तसेच महामानवा अभिवादन करणारे बॅनरही झळकले आहेत तर निळ्या ध्वजालादेखील नागरीकांकडून मागणी असल्याने दोन दिवसांपासून शहरातील विविध भागात विक्रेते दाखल झाले आहेत. शहरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त राखण्याचे नियोजन केले असून सोशल मिडीयावरही पोलिसांची करडी नजर असल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

महामानवाला अभिवादनासाठी लोटणार निळा भीमसागर
बसस्थानकाजवळील जुन्या पालिकेच्या कार्यालयासमोरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी गुरुवारी रात्री 12 वाजेनंतर मोठ्या प्रमाणावर अनुयायींसह नागरीकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिका कार्यालयासमोरील पुतळ्याचा परीसर चकाचक करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. पुतळा परीसरात पोलीस प्रशासनाकडे काटेकोर बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने केले आहे.

निळ्या ध्वजाला मागणी : 29 मिरवणुका निघणार
शहरात सर्वत्र बॅनर्स, निळे झेंडे व निळ्या रंगात रोशनाई करण्यात आल्याने संपूर्ण शहर निळेमय झाले आहे. रात्री दुभाजकातील पोलवर लावण्यात आलेली निळ्या रंगाची रोशनाई आकर्षण ठरत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. जयंतीनिमित्त शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 20 तर बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नऊ अश्या 29 मिरवणुका निघणार असून सर्व मिरवणूका पालिकेसमोरील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ आल्यानंतर त्यांचा समारोप होणार आहे.

दीपनगर येथे विविध कार्यक्रम
निंभोरा बुद्रूक (दीपनगर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रम होतील. गुरूवारी सायंकाळी 5 ते 10 या वेळात रांगोळी स्पर्धा, महामानवास विनम्र अभिवादन केले जाणार आहे. शुक्रवारी सकाळी 9 ते 12 पर्यंत वंदना, पूजन व पुष्पहार अर्पण, अ‍ॅड.रवीकांत वाघ यांचे वख्यान, सायंकाळी 5 ते 10 या वेळेत सजीव देखाव्यासह वाद्यासह मिरवणूक निघणार आहे. या संयुक्त समितीतर्फे 25 एप्रिलपर्यत विविध स्पर्धा होतील.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !