भुसावळ शहरात रेल्वेचा रोजगार मेळावा : 128 उमेदवारांना मिळाले नियुक्तीपत्र


Railway employment fair in Bhusawal city : 128 candidates got appointment letter भुसावळ : शहरातील रेल्वेच्या कृष्णचंद्र हॉलमध्ये रोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. याप्रसंगी 128 उमेदवारांना डीआरएम एस.एस. केडिया यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. केंद्र सरकारने केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार भुसावळ मंडळ येथे रोजगार मेळावा झाला. त्याचा लाभ उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व नवनियुक्त कर्मचार्‍यांनी घेतला. यावेळी रेल्वेतर्फे 128 उमेदवारांचा डीआरएम एस.एस.यांनी सत्कार केला.

उमेदवार म्हणाले ; रेल्वेची भरती प्रक्रिया पारदर्शक
नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर उमेदवारांनी रेल्वेतील भरती प्रक्रिया वेळेवर आणि पारदर्शकतेने झाल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. या कार्यक्रमास एडीआरएम (प्रशासकीय), सुनील कुमार सुमन, वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस.काझी तसेच विविध विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस.डोने वडनेरे यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व कल्याण निरीक्षक, सर्व पीआरओ, भरती विभाग, वैद्यकीय विभाग, अभियांत्रिकी विभाग, एस अ‍ॅण्ड टी, इलेक्ट्रिकल विभाग, आर.पी.एफ. विभागाकडून सहकार्य करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !