महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील मृतांचा आकडा 13 वर


13 people died in Maharashtra Bhushan celebration : Two victims in hospital नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने मृत्यू झाला होता मात्र सोमवारी पुन्हा दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू ओढवल्याने मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असून मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

ढिसाळ नियोजनामुळे नागरीकांचा बळ
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल सात लाख लोक सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उन्हात होते. भरउन्हात हा कार्यक्रम ठेवल्याने तसेच आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. नागपूरमधील महाविकास आघाडीची सभा आटोपून उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी तातडीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात धाव घेतली व रुग्णांची विचारपूस केली.

एका चांगल्या कार्यक्रमाला गालबोट
उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी कार्यक्रमाच्या नियोजनावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.अमित शहा यांना दुपारी गोव्याला जायचे होते त्यामुळेच कार्यक्रम भरदुपारी ठेवला का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, भरदुपारी कार्यक्रम ठेवणे ही चूक होती. कोणाच्या सूचनेवरुन या कार्यक्रमाचे नियोजन झाले, हे माहिती नाही मात्र अमित शहांना दुपारी जायचे असल्याने कार्यक्रमाची भरदुपारी वेळ ठेवली असेल तर हे दुर्दैवी आहे. एका चांगल्या कार्यक्रमाला यामुळे गालबोट लागले आहे.

मनुष्यवधाचा गुन्हा लावा : अतुल लोंढे
महाराष्ट्र भूषण कार्यक्रम हा भरउन्हात ठेवण्यात आला होता. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे व अंबादास दानवे यांनी केली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !