अजित पवारांचे भाजपात जाण्याचे फायनली ठरलं : सोशल मिडीयावरील पक्षाचे नाव व चिन्हही हटवले


Ajit Pawar will go to BJP ! : Name and symbol of party on social media also deleted मुंबई : सोशल मीडियावरील पक्षाचे नाव आणि चिन्ह असलेला वॉलपेपर अजित पवारांनी हटवल्यानंतर तो आता फायनली भाजपावर वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र पक्षाकडून व खुद्द शरद पवारांनी तसे घडणार नसल्याचा दावा केला आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा असून त्या अफवा असल्याचे म्हणत स्वतः अजित पवार, शरद पवार आणि महाविकास आघाडीतून जोरदार खंडन केले आहे मात्र अजित पवार 40 आमदारांना सोबत घेवून जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

पक्ष प्रवेशाच्या अफवाच
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या बातम्या अफवा असल्याचे सांगत स्वतः अजित पवारांपासून ते शरद पवारांपर्यंत सारेच जण खंडन करत आहेत. मात्र, तसे कृत्य होताना दिसत नाही. कारण अजित पवार यांनी कालचे कार्यक्रम ऐनवेळी रद्द केले. मात्र, असे कार्यक्रम नव्हते, असा खुलासा स्वतः अजित पवार यांनी केला. त्यानंतर आता सोशल मीडियावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले वॉलपेपर हटवलेत. त्यामुळे ही चर्चा पुन्हा सुरू झाली.

पक्ष चिन्ह व नाव नसल्याने चर्चांना ऊत
अजित पवार यांच्या ट्विटर हँडलवरही विरोधी पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असा परीचय आहे. सोबतच फेसबुकवर टाकलेल्याच दोन्ही पोस्ट आहेत. या फोटोवर पक्षाचे चिन्ह आहे. मात्र, ट्विटरच्या पेजवरही पक्षाचे नाव, चिन्ह असलेला वॉलपेपर नाही त्यामुळे अजित पवार खरेच नाराज आहेत का? नसतील तर मग पक्षाचे चिन्ह आणि नाव असलेला वॉलपेपर दोन्ही अकाउंटवर का नाही? अशी चर्चा सुरूय.

वृत्तपत्राच्या दाव्याने खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसमधील 53 आमदारांपैकी 40 जण अजित पवारांसोबत आहेत. भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवारांनी स्वत: या 40 आमदारांशी संपर्क साधला आहे’, असा दावा द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने केला आहे. तसेच अजित पवारांनी या 40 आमदारांची एका संमतीपत्रावर स्वाक्षरीदेखील घेतली असून वेळ येताच राज्यपालांकडे ही यादी सुपूर्द केली जाणार आहे, असा खळबळजनक दावाही या वृत्तपत्राने केला आहे. त्यामुळे अजित पवार हे पक्षातील आमदारांचा एक गट घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.

मोदी, शहांची हवी समंती
वृत्तपत्राच्या बातमीत पुढे म्हटले आहे की, राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल केव्हाही लागू शकतो. यात शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होण्याची शक्यता अधिक आहे. असे झाल्यास सरकार कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे हा निकाल येण्यापूर्वीच अजित पवारांना आपल्या गोटात खेचण्याची भाजपची ही खेळी आहे. मात्र, अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याला हिरवा झेंडा दाखवलेला नाही. दोघांकडून मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन मिळताच अजित पवार भाजपसोबत सत्ता स्थापन करतील.

राष्ट्रवादीत बंड नाही : शरद पवार
शरद पवार म्हणाले की, जे तुमच्या मनात आहे, ते आमच्या कुणाच्याही मनात नाही. अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार, या बातम्या निराधार आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसपुरते सांगू शकतो की, राष्ट्रवादीत असे कोणतेही बंड होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सहकारी एका विचाराने काम करत आहेत. पक्ष अधिक शक्तिशाली कसा बनवायचा, या भूमिकेतून आम्ही सर्वजण काम करत आहोत. याव्यतिरिक्त आमच्या कोणाच्याही मनात दुसरा कोणताही विचार नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !