मी आयुष्यभर राष्ट्रवादीतच राहणार : ‘त्या’ चर्चा माध्यमांनीच पसरवल्या ;  अजित पवार स्पष्टच म्हणाले


I will remain a NCP all my life : ‘That’ talk was spread by the media; Ajit Pawar clearly said मुंबई : मी राष्ट्रवादी सोडून भाजपात जाणार या चर्चा माध्यमांनीच पसरवल्या आहेत, कुणाही आमदारांच्या कागदावर सह्या घेण्यात आलेल्या नाहीत, मी राष्ट्रवादी आहेत व आयुष्यभर राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा दावा अजित पवारांनी करून चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्यासोबत काही आमदारांना घेऊन भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याच्या बातम्या समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली तर आता मात्र माध्यमांपुढे अजित पवारांनी जात या चर्चांना पूर्णविराम देत भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे.

माध्यमांच्या वृत्तामुळे कार्यकर्ते संभ्रमात
मंगळवारी दुपारी दोन वाजता माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, ’गेल्या काही दिवसांपासून माझ्याबद्दल आणि आमच्या सहकारी आमदारांबद्दल चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. त्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही. 40 आमदारांच्या सह्या घेतल्या आणि भाजपसोबत जाणार, असं दाखवलंय. पण, मी काही सह्या घेतल्या नाही, त्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. यामुळे आमचे कार्यकर्ते संभ्रमात जातात. कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी आपापली कामे करावीते. मीही तुमच्यासारखाच माणूस आहे, त्यामुळे सहनशिलतेचा अंत पाहू नका, अशी मी सर्वांना विनंती करतो.’ काही पत्रकारांना तर मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे अ‍ॅफेडेव्हीट लिहून देवू का, असे देखील सांगितल्याचे दादा म्हणाले.





आमचे वकीलपत्र दुसर्‍यांनी घेवू नये
’मी आणि आमचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत आणि पुढेही राहणार आहोत. वेगवेगळ्या चॅनेलमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे नेते आपले मत व्यक्त करत आहेत. त्यांनी आपापल्या पक्षाबाबत बोलावे, आमच्याबद्दल बोलू नये. आमचे वकीलपत्र दुसर्‍यांनी घेऊ नये. आमची भूमिका मांडण्यासाठी आमचे पक्षाचे नेते आहेत. त्यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, मी राष्ट्रवादीत पवार साहेबांसोबतच आहे.’

चुकीच्या बातम्यांमुळे चुकीचा संदेश
’आमदार मुंबईला आले म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट असतेच असे नाही. आमदार त्यांच्या कामासाठी मुंबईत येतात. ही नेहमीची पद्धत आहे, यात वेगळा अर्थ काढू नका. त्यांची कामे होती, ती कामे घेऊन ते आले होते. कारण नसताना अशा बातम्या आल्या तर आमच्या मित्रपक्षातही चुकीचा संदेश जातो. काहीजण उद्धव ठाकरेंना विचारतात, पृथ्वीराज चव्हाणांना विचारतात, मी त्यांना सर्व माहिती दिली आहे. मी स्पष्टपणे सांगतोय, या गोष्टीला पूर्णविराम लावा. अशाप्रकारच्या बातम्या थांबवा, अशी स्पटोक्ती अजित पवारांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !