मारहाण करून मोबाईल लांबवणारी आंतरराज्य टोळी जाळ्यात
जळगावातील रामानंद नगर पोलिसांची कारवाई : 42 मोबाईल जप्त
Interstate gang nabbed for beating and stealing mobile phones जळगाव : नागरीकांना अडवत मारहाण करून मोबाईल लांबवणार्या आंतरराज्य टोळीचा जळगावातील रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार आरोपींसह सहा अल्पवयींना ताब्यात घेण्यात आले असून चोरी केलेले तब्ब्ल 42 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. संशयित अल्पवयींना पुढे करून मोबाईल चोरी करीत असल्याचे तपासात पुढे आले असून या माध्यमातून अनेक चोर्या उघडकीय येण्याची शक्यता आहे.
अटकेतील आरोपी झारखंडचे रहिवासी
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा आठवडे बाजार आणि महाबळ परीसरातून अनुक्रमे 7 एप्रिल आणि 13 एप्रिल रोजी दोन जणांच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून लांवण्यात आले होते. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्यातील चार संशयित आणि सहा अल्पवयीन संशयित निष्पन्न करीत त्यांना ताब्यात घेतले. ताब्यातील सर्व संशयित आरोपी हे झारखंड राज्यातील रहिवासी असून त्यांच्याकडून चोरीचे एकूण 42 मोबाईल जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी लहान बालकांना हाताशी घेऊन मोबाईल चोरीचे उद्योग या टोळीकडून सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.




यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक एमराजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, पोलीस नाईक, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, चंद्रकांत पाटील, अतुल चौधरी, उमेश पवार, ईश्वर पाटील, अनिल सोनवणे, दीपक वंजारी, चालक संतोष पाटील यांनी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.