वरणगावात रेल्वेच्या धडकेने 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे मुंबई-अमरावती रेल्वेची धडक बसल्याने 25 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, वरणगाव स्थानकाजवळ 12111 मुंबई-अमरावती रेल्वेचा धक्का लागल्याने अनोळखीचा मृत्यू झाला. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
