मी मंत्री होईल हे स्वप्नातही वाटले नव्हते : गुलाबराव पाटील यांची कबुली


गुलाबराव म्हणाले ज्याला पेन्शन त्याला काय टेन्शन : लोकप्रतिनिधींचा रोल नटसम्राटाप्रमाणे

भुसावळ : कुटुंबात कुणीही राजकारणी नव्हते मात्र मी राजकारणात आलो व आमदार झालो व आता पाणीपुरवठा मंत्रीदेखील झालो मात्र मी मंत्री होईल हे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी प्रांजळ कबुली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिली. शनिवारी शहरात आयोजित एका खाजगी कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या खुमासदार शैलीत ते म्हणाले की, भुसावळ जंक्शन प्रमाणेच शिक्षणाचीदेखील पंढरी आहे. सेना-भाजपाची युती झाली असतीतर किमान 20-22 मंत्री पदे मिळाली असती मात्र तीन पक्षांना मिळून सरकार बनवावे लागले व आपल्यामागे कुठलेही लॉबींग नसताना मंत्री पदाची संधी मिळाली कारण स्पष्टवक्ता ही आपल्या स्वभावाची ओळख आहे व पंतप्रधान मोदींच्या सभेतही आपण बोलण्यास घाबरलो नाही कारण फार-फार काय झाले असते घरी बसावे लागते असते व घरी बसलेल्या आमदाराला लाख रुपये महिना पेन्शन मिळते त्यामुळे ज्याला पेन्शन त्याला काय टेन्शन, असे म्हणताच हास्याचे फवारे उडाले.

पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम करणार
गुलाबराव म्हणाले की, प्रेम वाटले तर प्रेम मिळते याचा प्रत्यय आमदारकीच्या व नगरपालिका निवडणुकीत आला. मुस्लीम समाजाने सर्वाधिक मतदान करून मला व शिवसेना उमेदवाराला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निवडून आणल्याचे ते म्हणाले. आज मंत्री झालो असलोतरी आपल्याला काहीही बदल झालेला नाही. 800 स्वेअर फुटांच्या घरातच आपण राहतो व जनतेच्या सेवेसाठी नेहमीच उपलब्ध असतो, असेही ते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !