भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक : नवापूर तालुक्यातील दोघे ठार


Speeding four-wheeler collides with two-wheeler : Two killed in Nawapur Taluka नवापूर : नवापूर तालुक्यातील धुळे-सुरत महामार्गावर सावरट गावाजवळ भरधाव वेगातील चारचाकीने वळत घेत असलेल्या दुचाकीला उडवल्याने नवापाडा, ता.नवापूर येथील दोघा प्रौढांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. नंदर्‍या होमा गावीत (60) व वेच्या महार्‍या गावीत (58, दोघे रा. नवापाडा, ता. नवापूर) अशी दोघा मयतांची नावे आहेत.

मुलीला भेटण्यासाठी जाताना अपघात
नंदर्‍या गावीत हे वेच्या गावीत यांच्यासह मंगळवारी सकाळी मुलीला भेटण्यासाठी सावरट येथे जात असताना सावरट गावाजवळील उड्डाणपुलाजवळ त्यांच्या दुचाकी (जी.जे.05 के.एल.1999) ला धुळ्याकडून सुरतकडे भरधाव वेगार्‍या जाणार्‍या (जी.जे. 01 आर.वाय 0875) या वाहनाने उडवल्याने नंदर्‍या गावीत यांचा जागीच तर वेच्या गावीत यांना रुग्णालयात हलवत असताना मृत्यू झाला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !