गतिमंद महिला बलात्कारातून गर्भवती : अज्ञाताविरोधात गुन्हा


Violent woman pregnant by rape : Crime against anonymity साक्री : महिला गतिमंद असल्याचा फायदा संशयिताने घेत तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्याने त्यातून पीडीता गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब साक्री तालुक्यातील एका गावात उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर पिंपळनेर पोलिसात (िेश्रळलश) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञाताचा पोलिसांकडून कसून शोध
याबाबत पीडित महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची 35 वर्षीय मुलगी गतीमंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात इसमाने तिच्याशी बळजबरीने वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले. यातून तिला गर्भधारणा झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.साळुंखे हे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !