पाचोरा शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार : संशयितांना 12 पर्यंत पोलीस कोठडी


Minor girl molested in Pachora City : Suspects remanded in police custody for up to 12 years पाचोरा : शहरातील एका भागातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात नराधम तरुणांनी धमकावून तसेच आमिष दाखवून अत्याचार केल्याची संतापजनक बाब उघडकीस आली होती. या प्रकरणी पाचोरा पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करीत सात आरोपींना अटक केल्यानंतर रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता 12 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
आजीसोबत वास्तव्यास असलेल्या 14 वर्षीय पिडीतेला आरोपींनी विविध आमिष दाखवून ठिकठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत सुमीत कश्यप, संकेत साठे, आकाश वाघ, गणेश भोई, जतीन चनाडे, अतुल महाजन, योगेश पाटील या सात तरुणांना अटक केली होती. आरोपींच्या अत्याचारातून पीडीता गरोदर असल्याचीही बाब समोर आली होती. दरम्यान, संशयिताना रविवारी न्यायालयात हजर केले असता 12 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल खताळ करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !