दुचाकींच्या धडकेने जळगावातील तरुणाचा अपघाती मृत्यू
Accidental death of young man in Jalgaon due to collision with two-wheelers जळगाव : उड्डाणपुलावर दोन दुचाकी समोर-समोर धडकल्याने झालेल्या अपघातात शहरातील तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू ओढवला. या प्रकरणी शनिवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रणजीत हिरालाल जोहरे (22, रा.भुरे मामलेदार प्लॉट, छत्रपती शिवाजीनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
रणजीत जोहरे हा तरूण मित्र तुषार याला हाताला जखम झाल्यामुळे अन्य मित्र गणेशसह 22 एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास दुचाकी (एम.एच.19 बी.ई.4445) ने उपचारासाठी दवाखान्यात जात असताना छत्रपती शिवाजी उड्डाणपुलावर समोरून आलेल्या दुचाकीने जबर धडक दिल्याने तिघे जखमी झाले तर रणजीतला अधिक दुखापत झाल्याने शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृतीत सुधार होत नसल्याने मुंबईला हलविण्यात आले मात्र 26 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेप्रकरणी शनिवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय करीत आहे.


