चोरट्यांचा मोर्चा आता कारकडे : जामनेरातून महागडी कार लांबवली


जामनेर : जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असताना जामनेरातून चोरट्यांनी एक लाख रुपये किंमतीची महागडी ईको कार लांबवली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कार चालकांमध्ये पसरली भीती
अमित सुरेश सैतवाल (40, गिरजा कॉलनी, जामनेर) हे खाजगी चारचाकी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे एक लाख रुपये किंमतीची (एम.एच.19 व्ही.जे.4557) क्रमांकाची इको कार आहे. शुक्रवार, 5 मे रोजी रात्री आठ वाजता अमित यांनी कार घरासमोर पार्क केली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संधी साधत कार लांबवली. या प्रकरणी शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक मुकेश आमोदकर करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !