लग्नाचे आमिष दाखवून जळगावातील तरुणीला फूस लावून पळवले


Abduction of a minor girl from Jalgaon जळगाव : जेडीसीसी बँकेकडे निघालेल्या अल्पवयीन तरुणीला लग्नाच्या उद्देशाने एका तरुणाने फूस लावून पळवून नेले. ही घटना शनिवारी दुपारी 12.30 वाजता घडली. या प्रकरणी संशयित मयूर (निमखेडी) याच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाविरोधात गुन्हा दाखल
शहरातील रींग रोड परीसरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अल्पवयीन तरुणी ही रींग रोडवरील जिल्हा बँकेजवळून घरी पायी जात असताना संशयिताने तिला फूस लावून पळवून नेले. अपहरण झालेल्या तरुणीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून मयूर (पूर्ण नाव माहित नाही) विरोधात शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !