रसलपूरला नवजात अर्भकाला गटारीत फेकले


A newborn baby was thrown into a sewer in Rasalpur रावेर : तीन ते चार दिवसाच्या नवजात मृत पुरूष जातीच्या बालकाला गटारीत फेकण्यात आल्याची संतापजनक घटना रावेर तालुक्यातील रसलपूर येथे रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात मातेविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अनैतिक संबंधातून हे बालक जन्माला आल्याचा संशय आहे.

नवजात बालकास गटारीत टाकले
रसलपूर येथील विलास महाजन यांच्या घरासमोरील गटारातून दुर्गंधी येत असल्याने महाजन यांनी फरशी उचलून पाहिली तर पुरुष जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले. ही बाब गावात वार्‍यासारखी कळताच मोठ्या संख्येने जमाव जमला तर रसलपूर येथील पोलीस पाटील प्रमोद यशवंत धनके यांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी रावेर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पथकाने धाव घेत मृत अर्भक रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविले. अर्भकाच्या डीएनए चाचणीसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. प्रवीण धनके यांच्या फिर्यादीनुसार रावेर पोलिसात अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक जगदीश पाटील करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !