नोकरीसाठी पाच लाख रुपये न आणल्याने मोहाडीतील विवाहितेचा छळ
पहूर : पतीला नोकरी लावण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये न आणल्याने मोहाडी येथील माहेर व किन्ही येथील विवाहितेचा छळ करण्यात आला तर तसेच मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी रविवारी पहूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
छळ असह्य झाल्याने गुन्हा
जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील माहेर असलेल्या सोनाली संतोष म्हस्की यांचा विवाह जामनेर तालुक्यातील किन्ही गावातील संतोष भास्कर म्हस्की यांच्यासोबत फेब्रुवारी 2021 मध्ये झाल्यानंतर लग्नानंतरच्या सात महिन्यानंतर पती संतोष याने नोकरी लावण्यासाठी विवाहितेला माहेरहून पाच लाखांची मागणी केली. पैसे आणले नाही म्हणून शिविगाळ व मारहाण करण्यात आली तसेच सासू, दीर आणि नणंद यांनीदेखील पैशासाठी छळ केला तसेच पती संतोष हा दारूच्या नशेत येवून पैशांसाठी विळा किंवा कुर्हाडीने मारून टाकेल, अशी धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या.
या आरोपींविरोधात गुन्हा
रविवारी विवाहितेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर पती संतोष भास्कर म्हस्की, सासू कासाबाई भास्कर म्हस्की, सासरे प्रमोद भास्कर म्हस्की (तिघे राहणार किन्ही, ता.जामनेर) व नणंद मनिषा अरूण गवळी (बुलढाणा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास किरण शिंपी करीत आहे.


