वादळी पाऊस व गारपीटमुळे पाडळसे येथील शेतकर्‍याचे चार लाखांचे नुकसान


A farmer in Padalse has lost four lakhs due to stormy rain and hailstorm यावल : तालुक्यातील पाडळसे येथील एका शेतकर्‍याचे वादळी पावसात चार लाखांचे नुकसान झाले. शेतकर्‍याने पारंपरीक शेतीच्या पलीकडे जावुन टरबुज लागवड केली होती मात्र वादळी पावसात त्यांचे मोठे नुकसान होत पीक उध्वस्त झाले. शासनाकडून पंचनामे झाले असून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

शेतकर्‍याने केली भरपाईची मागणी
पाडळसे, ता.यावल येथील शेतकरी रमेश रामभाऊ शिरनार यांनी बटाईने शेती केली होती व त्यांनी शेतामध्ये कर्ज काढून पाच एकर क्षेत्रात पारंपरीक शेतीच्या पलीकडे जावून टरबुज लागवड केली. टरबुज पिकांवर लाखो रुपये खर्च करुन फळ तोडणीवर आले असतांना तालुक्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली व यात त्यांच्या शेतातील संपूर्ण टरबुज पीक उद्ध्वस्त झाले आहे. महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. या अस्मामी संकटामुळे शेतकरी रमेश शिरनार यांचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !