जळगावात मुख्यमंत्र्यांना सत्तासंघर्षाबाबत छेडताच ते म्हणाले ; तुम्हाला सर्वांना शुभेच्छा


जळगाव : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत गुरुवार, 11 रोजी निकाल येण्याची शक्यता असतानाच जळगावात एका खाजगी कार्यक्रमात आलेल्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांना याबाबत छेडले असता त्यांनी याबाबत भाष्य टाळत माध्यम प्रतिनिधींना नमस्कार टाळत तुम्हाला सर्वांना शुभेच्छा एव्हढीच प्रतिक्रिया दिली.

जळगावात मुख्यमंत्र्यांची धावती भेट
आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या कन्येच्या बुधवारी जळगाव विवाह असल्याने वर-वधूंना आशीर्वाद देण्यासाठी दुपारी मुख्यमंत्री विशेष विमानाने जळगावात दाखल झाले व विमानतळावरून कारने सोनवणे यांच्या निवासस्थानी आले. वर-वधूला आशीर्वाद देऊन ते पुन्हा विमानतळाकडे रवाना झाले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !