बोदवडमध्ये एक लाख 36 हजारांचा मका लांबवला
बोदवड : शहरातील मनुर रोडवरील शांतीलाल पुखराज जैन अॅग्रो मार्केट यार्डमधून चोरट्यांनी एक लाख 36 हजार रुपये किंमतीचा मका लांबवल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. शेख आशिकोद्दीन शेख अल्लाउद्दीन (26, बोदवड) यांनी या प्रकरणी बोदवड पोलिसात फिर्याद दिली. शे.आसीफोद्दीन शे.अल्लाउद्दीन यांच्या मालकिचे एक लाख 10 हजार रुपये किंमतीचे 105 कट्टे तसेच गजानन साहेबराव पाटील यांच्या मालकीचे आठ हजार रुपये किंमतीचे आठ तर गौतम ग्यानचंद जैन यांच्या मालकीच्या दहा हजार रुपये किंमतीचे 12 कट्टे चोरट्यांनी लांबवले. एकूण एक लाख 36 हजार रुपये किंमतीचे कट्टे चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.
