जयंत पाटील स्पष्टच म्हणाले ; लग्नाच्या वाढदिवशीच मिळाली ईडीची नोटीस !


ED notice to NCP state president Jayant Patil मुंबई : देशात ईडीच्या का येतात? याबाबत मी अधिक बोलणे योग्य नाही मात्र काल हवालदाराने घरी आणून ईडीची नोटीस दिली व योगा-योगाने माझा वाढदिवसदेखील होता, अशी टिपणी करीत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, नोटीसीवरील क्रमांकाचे अवलोकन केल्याने आयएल व एफएसशी संबंधातून ही नोटीस आपल्याला बजावण्यात आली आहे मात्र या कंपनीला आपण ओळखत नाही, भेटलेला नाही, मनी लॉण्ड्रींग प्रकरणाशी आपला काडीमात्र संबंध येत नाही, अशी स्पष्टोक्ती जयंत पाटील यांनी दिली.

सोमवारी हजर राहण्याचे बजावले
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर त्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीसीतून देण्यात आले. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल असताना जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मनसे प्रमुखांनाही या आधी बजावली होती नोटीस
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही याआधीही या कंपनी प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.

ईमारतींसह बँक खाती जप्त
इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस मनीलाँड्रिंग आणि 570 कोटी रुपयांच्या मालमत्तांची जप्ती या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पहिले आरोपपत्र दाखल केले होते. आयएलअँडएफएसप्रकरणी ईडीने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि ब्रुसेल्स (बेल्जियम) येथील निवासी व व्यावसायिक इमारती आणि बँक खाती जप्त केलेली आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !