संविधान आर्मीच्या मोर्चाने दणाणले भुसावळ शहर


Bhusawal city was rocked by the march of Constitution Army भुसावळ : गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई मिळावी, शहरातील पाणीप्रश्न सुटावा तसेच विजेचा खोळंबा थांबून वीज ग्राहकांना जादा दरवाढीचा शॉक थांबवावा, भिल्ल समाजबांधवांना न्याय द्यावा अन्यथा अधिकार्‍यांनी खुर्ची खाली करावी, अशा घोषणा देत या मागण्यांसाठी संविधान आर्मीसह दहा संघटनांतर्फे बुधवार, 10 मे रोजी दुपारी एक वाजता पंचायत समिती, तहसील व महावितरण कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यापासून पायी मोर्चाला सुरूवात झाली. राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारत सूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास कामगार नेते जगन सोनवणे यांनी मोर्चापूर्वी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

यांचा मोर्चात सहभाग
मोर्चात संविधान आर्मी प्रदेश प्रमुख राकेश बग्गन, जिल्हा प्रमुख अल्पसंख्यांक आघाडी व संविधान आर्मी नेते आरीफ भाई शेख, संविधान आर्मी जिल्हा युवा प्रमुख सतीश ठाकणे, संविधान आर्मी रावेर तालुकाप्रमुख अशोक भाई आटकाडे, संविधान आर्मी भुसावळ तालुकाप्रमुख व मीडिया राज्य प्रमुख संघपाल किर्तीकर, संविधान आर्मी युवा भुसावळ तालुका प्रमुख चेतन सुरवाडे, पीआरपी युवा भुसावळ शहर प्रमुख सचिन बार्‍हे, श्री छत्रपती सेना जिल्हा प्रमुख गोपी साळी, भारतीय ओडबसम क्रांती प्रमुख चंदू पहेलवान, संविधान आर्मी युवा चर्मकार समाज नेते जयराज पूरभी, एकलव्य भिल्ल सेना विलास जाधव, बाबू शाह, समीर शेख, राष्ट्रीय मजदूर सेना प्रमुख सुनील ठाकूर, गजानन चराटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !