सगळे आमदार पळाले मग उद्धव ठाकरेंसोबत एकटा राहून काय करू म्हणून मी गेलो ! : मंत्री गुलाबराव पाटलांची स्पष्टोक्ती


All the MLAs ran away, then I went to be alone with Uddhav Thackeray. : Minister Gulabrao Patil ‘s candid speech जळगाव : आम्ही पक्ष सोडलेला नाही, दुसर्‍या पक्षासोबत गेलेलो नाही. अजूनही शिवसेने सोबतच आहोत त्यामुळे विरोधकांनी या गोष्टीचा विचार करायला हवा शिवाय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलेलो नाही, असे स्पष्ट मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. धरणगाव तालुक्यातील साळवा येथे आयोजित पाणीपुरवठा योजनेच्या शुभारभंप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरेंवर टिकेचे बाण चालवत ठाकरेंची सोबत का सोडली? याचादेखील उलगडा केला.

मी एकटा राहून काय करू
गुलाबराव म्हणाले की, सत्ता समीकरण बदलण्यासाठी राज्यातील अनेक भागातील आमदार शिंदे सोबत गेले. जळगावचे चार आमदार माझ्याही पहिले पळून गेले मात्र तोपर्यंत मी निर्णय घेतलेला नव्हता. नागपूर ते मुंबई मी एकटाच शिल्लक राहिलो होतो. मी एकट्याने उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून काय केलं असतं? गुवाहाटीला जाताना माझा तर 33 नंबर होता. माझ्या आधी 32 जण गेले, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील साळवे गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. या निमित्ताने मंत्री गुलाबराव पाटील हे भूमिपूजनासाठी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. लोकांनी आम्हाला गद्दार गद्दार म्हणून चिडवलं. सर्वच शिंदेंसोबत पळून गेले होते. चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? मग माझ्यावरती झाडी डोंगर खोके अशा जहरी टीका होत गेल्या.

तर महाराष्ट्राचा विकास झाला नसता
मी गेलो नसतो तर शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून विकास ज्या प्रकारे होत आहे तो महाराष्ट्राचा झाला नसता मात्र मी एकटाच मूळ ट्रॅकवर आलो आहे. 1987मध्ये मी शिवसैनिक झालो. बाळासाहेबांनी शिकवल्याप्रमाणे शिवसेनेसाठी काम केले. आणि आता हे माझ्यावर टीका करत आहेत, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

मंत्री पदाची खुर्ची सहज नाही, अनेकदा भोगली जेल
हे मंत्रीपद मला सहज मिळालं नाही. 15 ते 20 वेळा मी जेलमध्ये गेलो होतो. शिंगाडे मोर्चा म्हणून गुलाबराव पाटील हा महाराष्ट्रात फेमस होता. सर्व आयुष्य मी संघर्षात घातलं. त्यावेळेस मी सत्तेची लालसा केली नाही. मी तर मंत्रीपद सोडून गेलो होतो. माझी आमदारकीही गेली असती. एकनाथ शिंदेंसोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो. हिंदुत्वासाठी मी सट्टा खेळलो. भगवा झेंडा वाचवण्यासाठी मी आम्ही भाजपसोबत गेलो, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !