पालिका-महापालिका निवडणुका कधी होणार ? फडणवीसांनी सांगितला या महिन्याचा मुहूर्त


Shinde’s government decided: Elections will be held in October ! पुणे : राज्यातील महापालिकांसोबतच अनेक पालिकांच्या निवडणुका लांबल्या असून सध्या प्रशासकराज सुरू आहे मात्र या निवडणुका कधी होणार? याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ऑक्टोंबर महिन्यात निवडणुका होतील, असे फडणवीस म्हणाले आहेत. पुण्याचे भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात फडणवीस यांनी माहिती दिली शिवाय ते म्हणाले की, काही कायदेशीर बाबींमुळे महापालिका निवडणुकांचे प्रकरण कोर्टात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचीही माहिती
काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनीही ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील, असे म्हटले होते. रविवार, 7 मे रोजी बावनकुळे यांचा पिंपरी-चिंचवड शहरात दौरा झाला. त्यावेळी निगडी येथे पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, महापालिका निवडणुका घेण्यासाठी आता पुरेसा वेळ नाही. पावसाळ्यात निवडणुका घेता येणे शक्य नाही त्यामुळे ऑक्टोंबरमध्ये निवडणुका होतील.

महापालिका व पालिका निवडणुका लवकरच होणार
गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुका कधी होणार? याची विचारणा सर्वसामान्य मतदारांसह नगरसेवकांकडून केली जाते मात्र आता फडणवीस यांच्या स्पष्ट संकेतामुळे ऑक्टोंबर महिन्यात निवडणुका होण्याचे संकेत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून महापालिका निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !