हिंगोणा गावात दुचाकीवर काढलेल्या रावणाच्या चित्रांवरून दंगल : परस्परविरोधी गुन्हा


Riots over pictures of Ravan on a two-wheeler in Hingona village: A conflicting crimeयावल : तालुक्यातील हिंगोणा या गावात 21 वर्षीय तरुणाच्या दुचाकीवर रावणाचे चित्र पाहून त्यास पाच जणांनी शिविगाळ केली. यावरून वाद उफाळल्याने गावात दोन गटात दंगल उसळली. या प्रकरणी दोन्ही गटाकडून 11 जणांवर एकामेकांविरूध्द फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच संशयितांविरोधात गुन्हा
हिंगोणा गावात अतुल गाजरे यांच्या टपरीजवळ चेतन वसंत तायडे (21) हा तरुण मोटरसायकल घेऊन उभा असताना त्याच्या मोटरसायकलवर रावणाचे चित्र काढलेले होते. या ठिकाणी तुषार शांताराम कोळी, शुभम अनिल मोरे, भूषण रवींद्र कोळी, शांताराम पंडित कोडी व रोहित शांताराम कोळी (सर्व रा.हिंगोणा) हे पाच जण आले आणि रावणाचे चित्र मोटरसायकलवर काढण्याच्या कारणावरून चेतन तायडे याला त्यांनी शिविगाळ करीत मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पाच जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास हवलदार देविदास सूरदास करीत आहे.

दुसर्‍या गटाकडून सहा जणांवर गुन्हा दाखल
हिंगोणा गावात अतुल गाजरे यांच्या टपरीच्याजवळ तुषार शांताराम कोळी (20) हा तरुण उभा असताना काही एक कारण नसतांना या तरुणाला आकाश तायडे, अनुराग तायडे, धीरज तायडे, पृथ्वीराज तायडे, पवन चौहान, चेतन वसंत तायडे (हिंगोणा) या सहा जणांनी येऊन जबर मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात सहा जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार देविदास सूरदास करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !