‘माहेरची वारी’ उपक्रमात भुसावळातील सखींची धमाल

ललवाणी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम : स्व.तारादेवी ललवाणी यांच्या प्रतिमेचे अनावरण


Sakhis of Bhusawal are having fun in the ‘Maherchi Wari’ activity भुसावळ : शहरातील ललवाणी फाउंडेशनतर्फे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.डी. एम.ललवाणी यांच्या मातोश्रींच्या स्मृतीदिनानिमित्त ललवाणी फॉर्म हाऊसमध्ये गणेश मंदिरात स्व.तारादेवी ललवाणी यांच्या प्रतिमेचे अनावरण मदनलाल ललवाणी यांच्यास्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ललवाणी परीवारातील नलीन ललवाणी, मनीषा कर्नावट, मानस ललवाणी व महिला वर्ग उपस्थित उपस्थित होता. दरम्यान, फाउंडेशनच्या उपाध्यक्ष शोभा ललवाणी यांनी महिलांसाठी कुंभारी येथील जगात भारी कृषी पर्यटन केंद्रास सहलीचे आयोजन केले. यावेळी माहेरची वारी उपक्रमात भुसावळातील सखींची धमाल केली. त्यात सर्वधर्मीय महिलांचा समावेश होता.

महिलांनी केली धमाल
माहेरच्या वारी कार्यक्रमाचा महिलांनी येथेच्छ आनंद लुटला. या आनंदात विविध प्रकारचे खेळ, स्पर्धा, सफारी, रेन डान्सचा समावेश होता. या केंद्राचे संचालक प्रभाकर साळवे व ज्योती साळवे यांनी सुद्धा या आनंदात सहभाग घेतला. याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील ज्युनिअर भाऊ कदम यांनी विविध प्रकारे मिमिक्री करून महिलांचे मनोरंजन केले. प्रभाकर साळवे यांनी अनेक रोगांवरील औषधोपचाराची माहिती दिली. त्याचप्रमाणे खेड्याकडे चला या उक्तीप्रमाणे व तसेच कृषी क्षेत्रातील अनेक बाबी समजून सांगितल्या. महिलांनी घोडा सफारी, बैलगाडी सफारी, जंगल सफारी आदींचा मनमुराद आनंद घेऊन बारा बलुतेदार ही संकल्पना समजून घेतली. कार्यक्रमस्थळी सर्व महिलांचे हळदी, कुंकु, अक्षता लावून स्वागत करण्यात आले. ‘माहेरचा आहेर’ या कार्यक्रमात भुसावळ येथून गेलेल्या ललवाणी फाउंडेशनच्या सहभागी महिलामधील पहिले बक्षीस मयुरी राहुल संचेती यांना दोन ग्रॅम सोन्याची अंगठी तर वंदना ढाके यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. मंगला कोटेचा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

यांनी नोंदवला सहभाग
कल्पना गादीया, लता सिसोदीया, जयश्री बोथरा, संगीता मुगदिया, संगीता मंडलेचा, कल्पना नाहार, आशा मगरे, वैशाली मून, रीटा छेडा, पूनम कोळी, कविता डोंगरे, दीपा गादिया, मधू ललवाणी, मयुरी संचेती, कुंदन छाजेड, सुनीता गादिया, किर्ती कोटेचा, खुशबू सिसोदिया, सुनीता कुंभार, छाया ईंगळे, राधा शर्मा, उज्वला साखला, मोना बोरा, सोनल साखला आदींचा सहभाग होता. ललवाणी परीवाराचे व प्रभाकर साळवे परीवाराचे कौतुक करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !